Sunday, February 27, 2011

मराठी भाषा दिन

लाभले अम्हास भाग्य बोलतो मराठी । 
जाहलो खरेच धन्य ऐकतो मराठी ॥
धर्म, पंथ, जात एक जाणतो मराठी ।
एवढ्या जगात माय मानतो मराठी !!
 आमुच्या मनामनात दंगते मराठी ...!! 

''पाहुणे जरी असंख्य पोसते मराठी
  आपुल्या घरात हाल सोसते मराठी 
  हे असे कितीक खेळ पहाते मराठी''
  शेवटी मदांध तख्त फोडते मराठी -सुरेश भट...



        "आम्ही जपतो आमची मराठी संस्कृती,
  आमची निष्ठा आहे या मराठी मातीशी,
 
  आम्हाला अभिमान आहे महाराष्ट्रीय असल्याचा,
 
  आम्हाला गर्व तर आहेच पण,माजही आहे मराठी असल्याचा"
 
आज २७ फेब्रुवारी,कवी कुसुमाग्रज यांचा जन्मदिवस हा मराठी भाषा
 
दिवस म्हणून साजरा होतो..साहित्य क्षेत्रातील देशातील सर्वोच्च 
 
पुरस्कार मिळवणाऱ्या या कवीस भावपूर्ण आदरांजली.. मराठी भाषा 
 
दिवसाच्या निमितांने समस्त मराठी जनतेला एकच सांगणं आहे, 
 
पाठीवर हाथ ठेऊन नुसतं लढ म्हणावा ....  
 
मराठी भाषा दिनानिमित्त सर्व माझ्या मराठी बांधवांना हार्दिक शुभेच्या !!!!

Wednesday, February 23, 2011

सफलता के पांच अचूक मंत्र

सफलता के पांच अचूक मंत्र

Summary:pratima avasthi
सफलता के पांच अचूक मंत्र


लक्ष्य निर्धारित करना है, तो बड़ा करें। आपका लक्ष्य जितना बड़ा होगा। आपके काम करने का दायरा भी उसी के अनुसार व्यापक होता जाएगा। किसी ने सच ही कहा है कि सूर्य को पाने की चाहत रखोगे तो सूर्य ना मिले, पर चांद-सितारे तो मिल ही जाएंगे। ऐसे में यह स्वाभाविक है कि बड़ी सफलता केलिए हमारा लक्ष्य भी बड़ा होना चाहिए। कुछ ऐसे तरीके हैं, जिन्हें अपनाने के बाद कठिन से कठिन मंजिल भी आसान लगती है। जरूरत है केवल कोशिशों को लगातार जारी रखने की। आइये देखें सक्सेस के पांच सटीक मंत्र कौन-कौन से हैं।

पहली बात

आपने जो भी लक्ष्य देखा है, उसे कागज पर लिखकर दीवार पर चिपका दें। इससे कोई फर्क नहीं पड़ता कि ये आपके ख्वाब हैं या फिर आपकी सोच। इन्हें हमेशा अपने सामने रखें। हां, यह जरूर ध्यान रखें कि लक्ष्य अर्थपूर्ण होने के साथ ही ऐसा भी हो, जिसे पूर्ण किया जा सके। इसका एक अन्य लाभ भी है। आपका मन कभी भी रास्ते से नहीं भटकेगा। वैसे, आप इस तरह के उपाय हर दिन के कार्य के लिए भी कर सकते हैं।

दूसरी बात

कहते हैं कि स्वस्थ तन से ही स्वस्थ मन होता है। इसलिए अपने स्वास्थ्य पर अवश्य ध्यान दें। इसके लिए ना ही आपको अधिक परेशान होने की जरूरत है और ना ही कई दिनों तक उपवास रखने की। ध्यान केवल यह रखना है कि हर दिन की दिनचर्या आपने लिख ली है। इसमें आपने क्या घर में खाया? क्या खरीद कर खाया? दोस्तों ने कितना खिलाया या चाय पिलाया। इस नियम को अपनाने से आप अनहेल्दी फूड की ओर नहीं झुकेंगे और आपकी स्वास्थ्य भी ठीक रहेगी।

तीसरी बात

आपके पास दो तरह के लक्ष्य होते हैं। एक तो हर दिन का छोटा काम, जिन्हें आप उसी दिन पूर्ण करते हैं। दूसरा, बड़ा लक्ष्य, जिसे पूर्ण करने के प्रयास आपको लगातार करने होते हैं। इसलिए आपकी कोशिश यह होनी चाहिए कि आपका हर काम आपके जीवन के मुख्य लक्ष्य की ओर ही ले जाए। अगर ऐसा नहीं है, तो आपको योजना पर विचार करने की जरूरत है। जब आप खाली हों, तो इस पर अवश्य विचार करें कि आपने मूल लक्ष्य को पाने का कितना प्रयास किया।

चौथी बात अंग्रेजी में कहा गया है कि यू कांट गो इन पास्ट, बट यू केन मेक योर फ्यूचर। इसलिए पिछली विफलताओं पर पछताने से कोई फायदा नहीं होता। हां, उनसे सीख जरूर ले सकते हैं। आप यह सोचकर दुखी ना हों कि आज जिस स्थिति में हैं, वहां आपको नहीं होना चाहिए था। पीछे की दुर्घटना, उदासी के पल या दुर्भाग्य के लिए कोई स्थान नहीं होना चाहिए। केवल नई-नई बातों, यादों, अनुभवों और खुशियों के लिए ही जगह रखें।

पांचवी बात अक्सर लोग अपने संघर्ष के दिनों को याद करते हैं। अपनी कुछ गलतियों पर हंसते हैं और दुखी भी होते हैं। ऐसे में बातों से बाहर निकलने की जरूरत है। सच्चाई यह है कि हम अपनी जिंदगी में कई भूल करते हैं, जिन्हें याद कर हम अपना काफी समय पछतावा में ही गंवा देते हैं। पर इन सब बातों के बीच याद रखने वाली चीज यह है कि जिन लोगों ने विपरीत परिस्थितियों में विजय पाई, उनका तरीका क्या था?

सफलता के पांच अचूक मंत्र Originally published in Shvoong: http://hi.shvoong.com/social-sciences/sociology/1864199-%E0%A4%B8%E0%A4%AB%E0%A4%B2%E0%A4%A4-%E0%A4%95-%E0%A4%AA-%E0%A4%9A-%E0%A4%85%E0%A4%9A

Sunday, February 20, 2011

श्री द ग्रेट मराठा .....!! शिवाजीराजे महाराजाविषयी थोडेशे..........!!!

हिंदूंचा नवा अध्याय शिवरायांपासून सुरू होतो.
हिंदू राजांनी विश्वास ठेवावा आणि परकियांनी दगे द्यावेत
हा इतिहास बदलून शिवरायांनी दगे द्यावेत आणि
शत्रूला थक्क करावे हा नविन इतिहास सुरू झाला...

कडेकपारीत उगवलेलं रानफूल,
पुष्पराज गुलाबाप्रमाणे सौंदर्यसंपन्न, सुगंधी नसतं,
पण म्हणून ते कधी गुलाबाची बरोबरी करू शकणार नाही
असं मुळीच नाही, किंबहुना ते रानफुल या गुलबापेक्षाही श्रेष्ठ असतं
जेव्हा ते माझ्या राजाच्या एखाद्या गडकोटावर उगवलेलं असतं.

महाराजाविषयी थोडेशे............ .

अधिकारकाळ- जून ६, १६७४ - एप्रिल ३, १६८०

राज्याभिषेक- जून ६, १६७४

राज्यव्याप्ती- पश्चिम महाराष्ट्र, कोकण,सह्याद्री डॊंगररांगांपासून नागपूरपर्यंत
आणिउत्तर महाराष्ट्र, खानदेशापासूनदक्षिण भारतात तंजावर पर्यंत

राजधानी- रायगड

पूर्ण नाव- शिवाजीराजे शहाजीराजे भोसले

पदव्या- गोब्राह्मणप्रतिपालक

जन्म- फेब्रुवारी १९, १६३० शिवनेरी किल्ला, पुणे

मृत्यू- एप्रिल ३, १६८० रायगड

उत्तराधिकारी- छत्रपती संभाजीराजे भोसले

वडील- शहाजीराजे भोसले

आई- जिजाबाई

पत्नी- सईबाई,सोयराबाई,पुतळाबाई,काशीबाई,सकवारबाई

संतती- छत्रपती संभाजीराजे भोसले, छत्रपती राजारामराजे भोसले

राजघराणे- भोसले

राजब्रीदवाक्य-
'प्रतिपच्चंद्रलेखेव वर्धिष्णुर्विश्ववंदिता शाहसुनोः शिवस्यैषा मुद्रा भद्राय राजते।'

चलन- होन, शिवराई (सुवर्ण होन, रुप्य होन??)

(((( १ - जन्मदिनांकाच्या निश्चितीबद्दल मतमतांतरे आहेत. ))))

शिवकल्याण राजा।।
निश्र्चयाचा महामेरू, बहुतजनांसी आधारू, अखंडस्थितीचा निर्धारू, श्रीमंत योगी ।।
नरपती, हयपती, गजपती। गडपती, भूपती, जळपती।पुरंदर आणि शक्ति पृष्ठभागी।।
यशवंत, कीर्तीवंत, सामर्थ्यवंत। वरदवंत, पुण्यवंत, नीतीवंत। जाणता राजा ।।
आचरशील, विचारशील, दानशील। धर्मशील सर्वज्ञपणे सुशील। सकळाठाई ।।
धीर उदार गंभीर। शूर क्रियेसी तत्पर ।सावधपणे नृपवर तुच्छ केले।।
देवधर्म गोब्राह्मण, करावया संरक्षण।।
हृदयस्थ झाला नारायण, प्रेरणा केलीया भूमंडळाचे ठाई, धर्मरक्षी ऐसा नाही।
महाराष्ट्र धर्म राहिला काही, तुम्हा कारणी।।कित्येक दृष्ट संहारली।
कित्येकासी धाक सुटला ।कित्येकाला आश्रयो जाहला
।शिवकल्याण राजा। शिवकल्याण राजा।।शिवकल्याण राजा।।

"मराठा तितुका मेळवावा, महराष्ट्रधर्म वाढवावा"

जय भवानी ! जय शिवाजी !!

मराठीला कधीच कमी समजू नका..!

जय महाराष्ट्र..../>
करा कष्ट......./
व्हा श्रेष्ठ......./

मराठी असल्याचा गर्व आहे.............असलाच पाहिजे..
श्री द ग्रेट मराठा

Sunday, February 13, 2011

यशस्वी होण्यासाठी लागणारे मूलभूत गुण........!!!!

आपल्यातील प्रत्येक माणसाला यशस्वी
व्हावे असे वाटत असते. यश हे आपल्या दृष्टिकोनाचा आणि त्याच्यासाठी आपण
घेतलेल्या योग्य परिश्रमाचा परिपाक आहे. आपल्याला यशस्वी व्हायचे असेल, तर
यशस्वी होण्यासाठी लागणारे मूलभूत गुण आपण अंगी बाळगायला हवेत.
त्याचप्रमाणे अयशस्वी व्यक्तिमत्त्वात असणारे मूलभूत दोष दूर करायला हवेत.
उच्च परिणाम साधणारी मनोधारणा असणे आवश्यक आहे आणि ती मिळविण्यासाठी उपयोगी
पडतील अशा सात पायऱ्या आज आपण बघणार आहोत

आपला जन्मच यशस्वी होण्यासाठी झालाय, यश
हा निसर्गाचा नियमच आहे.'
प्रत्येक परिणामाला कारण असते आणि
प्रत्येक कारणाचा एक विशिष्ट परिणाम होणे हे अपरिहार्य आहे. यश हा अपघात
नाही, तर तो जाणीवपूर्वक केलेल्या कामाचा परिणाम आहे. आपण यशस्वी व्हावे
असे कोणाला वाटत नाही? आपल्यातील प्रत्येक माणसाला यशस्वी व्हावे असे वाटत
असते. यश हे आपल्या दृष्टिकोनाचा आणि त्याच्यासाठी आपण घेतलेल्या योग्य
परिश्रमाचा परिपाक आहे. डॉक्टर ज्याप्रमाणे रुग्णाची लक्षणे अभ्यासून
त्याला झालेल्या रोगाचे निदान करतात, त्याचप्रमाणे यशस्वी आणि अयशस्वी
व्यक्तींच्या अवतीभोवती त्यांची लक्षणे आपल्याला बघायला मिळतात, सापडतात.
त्यांचे स्वभाव, त्यांची व्यक्तिमत्त्वे याचा आपण अभ्यास केला तर यश आणि
अपयश माणसांच्या पदरी का पडते, हे आपण समजावून घेऊ शकतो. आपल्याला यशस्वी
व्हायचे असेल, तर यशस्वी होण्यासाठी लागणारे मूलभूत गुण आपण अंगी बाळगायला
हवेत. त्याचप्रमाणे अयशस्वी व्यक्तिमत्त्वात असणारे मूलभूत दोष दूर करायला
हवेत. उच्च परिणाम साधणारी मनोधारणा असणे आवश्यक आहे आणि ती मिळविण्यासाठी
उपयोगी पडतील अशा सात पायऱ्या आज आपण बघणार आहोत. त्या अशा :


यशाची व्याख्या करणे तसे अवघड आहे. ती प्रत्येक माणसागणिक वेगळी होईल.
सर्वसामान्यपणे यश म्हणजे "उचित ध्येयाच्या दिशेने, उद्दिष्टप्राप्तीसाठी
करावयाच्या सततच्या प्रवासाची अनुभूती.' मला यशाची व्याख्या "स्वतः आनंदी
राहून इतरांनाही आनंदी करण्याची क्षमता, इतरांवर प्रेम करण्याची आणि
इतरांकडूनही प्रेम संपादन करण्याची क्षमता, स्वतःशी, आपल्या सभोवतालच्या
माणसांशी आणि विश्वविधानांशी शांतीचे समतोल आणि सुसंवादी जीवन संबंध
निर्माण करण्याची क्षमता म्हणजे यश,' अशी करायला आवडेल. असे यश संपादन
करण्यासाठी उपयोगी पडतील अशा सात गोष्टींचा विचार आपण या लेखात करणार आहोत.
म्हणजेच यशाची "सप्तपदी' चालणार आहोत.


1) ज्वलंत इच्छा : इच्छा
ही प्रत्येक कृतीची जननी आहे. आपले उद्दिष्ट गाठण्याची प्रेरणाच ज्वलंत
इच्छेतून निर्माण होत असते. शिवाजी महाराजांचे उदाहरण येथे देता येईल.
"स्वराज्याची स्थापना मी करेनच' या ज्वलंत इच्छेतूनच त्यांनी अद्वितीय काम
उभे केले. इतक्या प्रतिकूल परिस्थितीत अशी कामगिरी करणारे शिवाजी महाराज हे
एकच उदाहरण असेल. नेपोलियन हिल यांनीही म्हटले आहे, की माणसाचे मन ज्या
कल्पना करते त्याच्यावर त्याची श्रद्धा बसते आणि नंतर तो ते करूनही
दाखवितो. ज्वलंत इच्छा हीच सर्व ध्येयप्राप्तीची सुरवात असते. छोटी ठिणगीच
पुढे जाऊन मोठा वणवा निर्माण करते. कमकुवत इच्छा मात्र काहीच करू शकत नाही.


2) वचनबद्धता : सचोटी

आणि शहाणपण या दोन मजबूत खांद्यावरच वचनबद्धता उभी राहू शकते. एकदा नुकतेच
लग्न झालेला मुलगा आपल्या वडिलांचे आशीर्वाद घ्यायला गेला होता. नमस्कार
केल्यावर वडील त्याला म्हणाले, ""बेटा, आयुष्यात प्रामाणिकपणा आणि शहाणपणा,
तारतम्य या गोष्टी लक्षात ठेव!'' मुलाने जरा प्रश्नार्थक चेहऱ्याने
वडिलांकडे पाहिले. त्यावर त्यांनी खुलासा केला, की प्रामाणिकपणा म्हणजे
दिलेला शब्द तंतोतंत पाळणे आणि शहाणपण म्हणजे अवास्तव शब्द न देणे. दिलेला
शब्द पाळायचा म्हणजे सचोटी आणि मुळातच मूर्खपणाचा शब्द न देणे म्हणजे
शहाणपणा. यश हे आपले विचार आणि निर्णय याचं फलित असत. ज्ञान म्हणजे प्रचंड
सामान्यज्ञान, तर शहाणपण म्हणजे मिळवलेल्या ज्ञानाचा उचित वापर होय.


3) जबाबदारी : ज्यांना

चारित्र्य असते अशीच माणसे जबाबदारी घेतात. हीच माणसे जबाबदारी स्वीकारीत
आपले भविष्य घडवू शकतात. उत्तरदायित्व घेणे नेहमीच धोक्याचे असते.
त्यामुळेच जबाबदारी घेणे नेहमीच त्रासदायक वाटते, अवघड असते. त्यामुळेच
बरेच लोक आपल्याला ठराविक मर्यादा घालून घेतात आणि कोणतेही जबाबदारी न
स्वीकारताच सर्वसाधारण निष्क्रिय आयुष्य जगत असतात. अशी माणसे चमत्कार
घडविण्यापेक्षा चमत्काराचीच वाट पाहत आपले आयुष्य घालवीत असतात. एका
माणसाने एका शेतकऱ्याला विचारले, ""चालू हंगामात गहू पेरणार का?'' त्यावर
शेतकऱ्याने उत्तर दिलं, ""नाही, कारण यंदा पावसाची काही खात्री नाही.''
त्या माणसाने यावर विचारलं, ""मग तू मका पेरणार का?'' तो शेतकरी म्हणाला,
""नाही, मक्याच्या पिकावर कीड पडेल अशी मला भीती वाटते.'' यावर त्या
माणसाने विचारलं, ""मग तू काय पेरणार आहेस?'' शेतकरी म्हणाला, ""काही नाही.
मला कोणताही धोका पत्करायचा नाही.''

  
5) सकारात्मक
श्रद्धा/विश्वास : सकारात्मक
विश्वास हा सकारात्मक विचारांपेक्षा खूप श्रेष्ठ असतो. सकारात्मक
विचारसरणीचा फायदा होईल, असं निश्चितपणे वाटणे म्हणजे सकारात्मक विश्वास.
नुसत्या इच्छेला किंवा स्वप्नांना येथे वावच नसतो. सामना हा पराभव
टाळण्यासाठी नाही तर जिंकण्यासाठीच, खेळण्याची जिद्द हा सकारात्मक विश्वास
देते.

6) सातत्याची ताकद : सातत्य

म्हणजे ठरवलेल्या ध्येयावरची निष्ठा. याचाच अर्थ हाती घेतलेले काम पूर्ण
होईपर्यंत अविचल प्रयत्न करण्याची तयारी, अविश्रांत प्रयत्न करणे. आपण
थकल्यावर काम बंद करणे, वरवर चांगले वाटते; परंतु जेते मात्र यासाठी कस
लावतात. स्पर्धा जिंकणाऱ्या खेळाडूंकडे बघा. ते प्रयत्न करतात आणि
पूर्णत्वाला गेल्यावरच थांबतात. एडिसनने दिव्याचा शोध लावण्यासाठी हजार
अपयश पचवलीत. प्रत्येक प्रयत्नाकडे अपयश म्हणून न बघता एका अयोग्य मार्गाचा
शोधच मला लागला, ही जिद्द बाळगली. अपयशी माणसांची सुरवात तर उत्तमच असते;
परंतु ते शेवटी गडबडतात, थकतात आणि प्रयत्न थांबवतात. योग्य हेतूमधूनच
सातत्य निर्माण होते. हेतूच जर पक्का नसेल तर आयुष्य कच खाते, घसरडे,
निसरडे होते. हेतू नसला तर माणूस सातत्याने प्रयत्न न करताच हार मानतो.
पाण्यासारखा मृदू पदार्थ सतत खडकासारख्या कठीण पदार्थावर पडत राहिला तर
सातत्यामुळेच त्यात खड्डे पाडतो.


7) कामगिरीचा अभिमान,
गर्व : आपण
अंगीकारलेल्या कामात सन्मान असला तरच त्यातून उत्कृष्टता निर्माण होते.
कामगिरीचा अभिमान म्हणजे अहंकार नव्हे. यात नम्रता आणि आनंद असतो. माणसाची
गुणवत्ता आणि त्याच्या हातून घडणाऱ्या कामगिरीची गुणवत्ता या अविभाज्य
गोष्टी आहेत. साशंक हृदयाने केलेले प्रयत्न अर्धवट नाही तर शून्य परिणाम
साधतात. प्रत्येक कामगिरी ही त्या माणसाचे स्वतःचे चित्रच उभे करत असते. मग
त्याचे काम काही का असेना; कार धुणे, अंगण स्वच्छ करणे किंवा घराला रंग
देणे. माणसाचा दर्जा कामाने नाही तर ते काम तो कशा पद्धतीने करतो, त्यावर
ठरत असतो. उत्कृष्टता ही आतून येत असते आणि तीच जेत्याचे रूप घेत असते
.