लाभले अम्हास भाग्य बोलतो मराठी ।
जाहलो खरेच धन्य ऐकतो मराठी ॥
धर्म, पंथ, जात एक जाणतो मराठी ।
एवढ्या जगात माय मानतो मराठी !!
आमुच्या मनामनात दंगते मराठी ...!!
''पाहुणे जरी असंख्य पोसते मराठी
आपुल्या घरात हाल सोसते मराठी
हे असे कितीक खेळ पहाते मराठी''
शेवटी मदांध तख्त फोडते मराठी -सुरेश भट...
"आम्ही जपतो आमची मराठी संस्कृती,
आमची निष्ठा आहे या मराठी मातीशी,
आम्हाला अभिमान आहे महाराष्ट्रीय असल्याचा,
आम्हाला गर्व तर आहेच पण,माजही आहे मराठी असल्याचा"
आज २७ फेब्रुवारी,कवी कुसुमाग्रज यांचा जन्मदिवस हा मराठी भाषा
दिवस म्हणून साजरा होतो..साहित्य क्षेत्रातील देशातील सर्वोच्च
पुरस्कार मिळवणाऱ्या या कवीस भावपूर्ण आदरांजली.. मराठी भाषा
दिवसाच्या निमितांने समस्त मराठी जनतेला एकच सांगणं आहे,
पाठीवर हाथ ठेऊन नुसतं लढ म्हणावा ....
मराठी भाषा दिनानिमित्त सर्व माझ्या मराठी बांधवांना हार्दिक शुभेच्या !!!!
No comments:
Post a Comment